नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

बिहार येथील महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध धर्मियांकडे द्यावे

बिहार येथील महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध धर्मियांकडे द्यावे...माजी आमदार सुधाकर कोहळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन...

नागपूर,दिनांक. 15 एप्रिल 2025: - बिहार येथे असलेले महाबोधी महाविहाराच्या व्यवस्थापन समिती मधील संपूर्ण सदस्य हे बौद्ध धर्मीय असावे अशी मागणी माजी आमदार आणि भाजपचे ग्रामीण अध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी निवेदनाद्वारे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांना दिले. महाबोधी महाविहार हे जगातील बौद्ध धर्मियांचे श्रद्धास्थान आहे. या महाविहाराचे व्यवस्थापन महाबोधी टेम्पल 1949 नुसार संचालित होते. या ॲक्टनुसार या महाविहाराच्या व्यवस्थापन समिती मध्ये चार हिंदू आणि चार बौद्ध धर्मीय सदस्यांचा समावेश आहे. या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतात. मात्र या ॲक्टनुसार ते सुद्धा हिंदू असणे आवश्यक आहे. या ॲक्टच्या शिर्षकामध्ये बोधगया हा शब्द स्पष्ट करतो की हे बौद्ध धर्मियांचे विहार आहे. बौद्ध आणि हिंदू धर्मियांचे धार्मिक पद्धती वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे बोधगया टेम्पल ॲक्ट 1949 च्या शिर्षकामध्ये बदल करून महाबोधी महाविहार शीर्षक असे करून विहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध धर्मियांकडे द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी भाजपचे नागपूर जिल्हा महामंत्री अनिल निधान - महामंत्री संध्या गोतमारे - महामंत्री रिंकेश चवरे - माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी - मनोज चवरे - विस्तारक रामटेक विधानसभा - नरेश मोटघरे - अध्यक्ष भाजपा अनुसूचित जाती मोर्चा - सुरेंद्र शेंडे महामंत्री - अनुसूचित जाती मोर्चा, अजय बोढारे - संयोजक कामठी विधानसभा, निलेश बुचूडे - महामंत्री अनुसूचित जाती मोर्चा, सुभाष गुजरकर - माजी जी. प. सदस्य - राहुल बागडे - अध्यक्ष कोराडी शहर अनुसूचित जाती आदी उपस्थित होते.
संयोजक कामठी विधानसभा, निलेश बुचूडे - महामंत्री अनुसूचित जाती मोर्चा, सुभाष गुजरकर - माजी जी. प. सदस्य - राहुल बागडे - अध्यक्ष कोराडी शहर अनुसूचित जाती आदी उपस्थित होते.