नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

आयसीएसआय स्टुडंट्स एज्युकेशन फंड ट्रस्ट यासारख्या विषयांवर भर दिला

आयसीएसआयचे अध्यक्ष सीएस बी. नरसिंहन यांनी मीडियाशी संवाद साधला आणि आयसीएसआयची भूमिका, गव्हर्नन्स आणि कंप्लायन्स, आयसीएसआय इंटरनॅशनल एडीआर सेंटर

नागपुर दि.16 नोव्हेबर 2024:- नागपूर चॅप्टर ऑफ आयसीएसआय ने नागपूर चॅप्टर ऑफिसमध्ये कंपनीज अॅक्ट, 2013, डिकोडिंग कंपनीज अॅक्ट: एम्पॉवरींग कंप्लायन्स अँड गव्हर्नन्स १या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (आयसीएसआय) च्या नागपूर चॅप्टरने 16 नोव्हेंबर 2024 ला त्यांच्या सदस्य आणि विद्यार्थ्यांसाठी कंपनीज अॅक्ट, 2013 या विषयावर नागपूर चॅप्टर ऑफिस, फर्स्ट फ्लोर, श्री साई प्रसाद एन्क्लेव्ह, प्लॉट क्र. 164, विवेकानंद नगर, नागपूर (महाराष्ट्र) येथे कार्यशाळेचे आयोजन केले. कार्यशाळेचे प्रमुख पाहुणे आयसीएसआयचे अध्यक्ष सीएस बी नरसिंहन होते. या कार्यक्रमाला वेस्टर्न इंडिया रीजनल काउंसिल (डब्ल्यूआयआरसी) ऑफ आयसीएसआयच्या सेक्रेटरी सीएस दीप्ती जोशी, आयसीएसआयच्या नागपूर चॅप्टरचे अध्यक्ष सीएस भावेश थडानी, उपाध्यक्ष सीएस मोहित बत्रा, सचिव सेक्रेटरी सुमित खिचा, कोषाध्यक्ष सीएस दीशा श्रॉफ, समितीचे सदस्य सीएस खुशाल बजाज, सीएस हर्षल किल्लेदार आणि सीएस सराह हुसेन कटवाला उपस्थित होते. या प्रसंगी पत्रकार परिषदही आयोजित करण्यात आली होती. आयसीएसआयचे अध्यक्ष सीएस बी. नरसिंहन यांनी मीडियाशी संवाद साधला आणि आयसीएसआयची भूमिका, गव्हर्नन्स आणि कंप्लायन्स, आयसीएसआय इंटरनॅशनल एडीआर सेंटर, द आयसीएसआय इंस्टिट्यूट ऑफ सोशल ऑडिटर्स, द आयसीएसआय सोशल ऑडिट स्टँडर्ड, द आयसीएसआय स्टार्टअप आणि एमएसएमई कॅटालिस्ट, द आयसीएसआय नॅशनल अवॉर्ड ऑफ एक्सलन्स इन कॉर्पोरेट गव्हर्नन्स अवॉर्ड, द आयसीएसआय यूडीआयएन, ईसीएसआईएन, आयसीएसआय ओव्हरसीज सेंटर्स, इंटरनॅशनल कॉन्फरन्स, विद्यार्थ्यांसाठी आयसीएसआय नवीन उपक्रम, कॉर्पोरेट आणि सिक्युरिटी मार्केट कंप्लायन्स (सीएसएमसी), आयसीएसआय गुरु श्रेष्ठ अवॉर्ड, इंटरनॅशनल कॉमर्स ऑलिम्पियाड, आयसीएसआय अकॅडमिक कनेक्ट, संरक्षण कर्मचारी, अग्निवीर आणि शहीद कुटुंबांसाठी आयसीएसआय फी माफी योजना, पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांसाठी फी मध्ये सवलत, आयसीएसआय स्टुडंट्स एज्युकेशन फंड ट्रस्ट यासारख्या विषयांवर भर दिला. या प्रसंगी दोन पॅनल चर्चांचेही आयोजन करण्यात आले होते. पहिल्या पॅनल चर्चेतील विषय कंपनीज अॅक्ट, 2013 होता, ज्यामध्ये पॅनल चर्चासत्राचे पॅनलिस्ट सीएस सुनील झोन आणि सीएस चंचल राठोड होते, तर सीएस ओमप्रकाश बागडिया यांनी चर्चेचे समन्वयक म्हणून काम केले. दुसऱ्या पॅनल चर्चेचा विषय डिकोडिंग कंपनीज अॅक्ट: एम्पॉवरींग कंप्लायन्स अँड गव्हर्नन्स होता. या पॅनल चर्चेतील पॅनलिस्ट सीएस पूजा लुथरा आणि सीएस जय सोडानी होते, तर समन्वयक म्हणून सीएस सर्राह हुसेन कटवाला यांनी भूमिका निभावली. कार्यशाळेची सुरुवात आयसीएसआयच्या अध्यक्षांनी नागपूर चॅप्टरच्या सदस्यांशी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधून केली. या कार्यक्रमाला इन्सॉल्वेंसी प्रोफेशनल्स, कंपनी सेक्रेटरी, वकील, आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सुमारे 70 प्रतिनिधींचा सहभाग होता.
कार्यशाळेची सुरुवात आयसीएसआयच्या अध्यक्षांनी नागपूर चॅप्टरच्या सदस्यांशी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधून केली. या कार्यक्रमाला इन्सॉल्वेंसी प्रोफेशनल्स, कंपनी सेक्रेटरी, वकील, आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सुमारे 70 प्रतिनिधींचा सहभाग होता.