नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

हिंगण्याच्या भाजप आमदाराला विकास पुरुष मणून घेण्याचा अधिकार नाही - माजी मंत्री सुनील केदार

स्वतःला विकास पुरुष म्हणवुन मोठमोठे बॅनर लावून स्वतःची बढाई मारणाऱ्या हिंगण्याच्या आमदाराला स्वतः दत्तक घेतलेलं गावाचा विकास करता आला नाही तर असा माणूस हिंगणा विधानसभा क्षेत्राचा

नागपूर : - हिंगण्याच्या भाजप आमदाराला विकास पुरुष मणून घेण्याचा अधिकार नाही - माजी मंत्री सुनील केदार , (रमेशचंद्र बंग यांच्या प्रचारार्थ गोधनी, फेटरी, दौलामेठी, वाडी येथे सुनील केदार यांच्या जाहीर सभा ) स्वतःला विकास पुरुष म्हणवुन मोठमोठे बॅनर लावून स्वतःची बढाई मारणाऱ्या हिंगण्याच्या आमदाराला स्वतः दत्तक घेतलेलं गावाचा विकास करता आला नाही तर असा माणूस हिंगणा विधानसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास कसा काय करेल. सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर स्वतःचा विकास करून हिंगणा क्षेत्राचा विनाश करणाऱ्या हिंगणा क्षेत्राच्या आमदाराला स्वतःला विकास पुरुष म्हणण्याचा अधिकार नाही असे सुनील केदार रमेशचंद्र बंग यांच्या प्रचारार्थ गोधनी, फेटरी, दौलामेठी, वाडी येथे आयोजित जाहीर प्रचार सभेत बोलत होते. यावेळी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून रमेशचंद्र यांनी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाकरिता आपल्याला शेवटची संधी द्यावी अशी विनंती मतदारांना केली. तर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष कुंदा राऊत यांनी हिंगणाक्षेत्र भाजपच्या आमदारांमुळे विकासापासून दूर राहिला असा घनाघात केला. यावेळी माजी आमदार विजय घोडमारे (पाटील ) जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष कुंदाताई राऊत, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती उज्वलाताई बोढारे, जिल्हा परिषद सदस्य ममताताई धोपटे जिल्हा परिषद सदस्य वृंदाताई नागपुरे,नागपूर पंचायत समितीच्या सभापती रुपालीताई मनोहर, कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूरचे उपसभापती प्रकाश नागपुरे,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश संघटन सचिव प्रेम झाडे, प. स नागपूर सदस्य प्रीतीताई अखंड, राजेश जैस्वाल, संतोष नरवाडे, प्रा सुरेंद्र मोरे, श्याम मंडपे, प्रदेश सरचिटणीस राजू राऊत, ईश्वर बाळबुधे,भीमराव कडू, कम्युनिस्ट पार्टीचे रामेश्वर चरपे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नागपूर तालुका अध्यक्ष संजय कुंटे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मिथिलेश कन्हेरे आश्विन बैस, रॉबिन शेलारे ,युवक अध्यक्ष रोशन खाडे, मुकेश ढोमणे, अरूण राऊत, राजेश महाजन ,राजेंद्र अखंड,अब्दुल वाहिद. बाबाजी पंडित , अनिल काळमेघ, सुनील कलमेघ, स्वप्नील गावंडे , राहुल
मनोहर , रामदास राऊत , अर्चना काकडे , नितनवरे ताई ,सुचिता गजलवार , रोहिणी खोरगडे, रुपा साबळे, शमीन, शेख, रीना वर्गीस, नितीन लांडगे, राहुल शास्त्री रवींद्र खांबलकर , मृणाली ढोरेवार, दिगंबर घोडमारे , प्रभाकर शास्त्री, गंगाधर शास्त्री सुधीर घोडमारे, प्रशांत पवार जितेंद्र पवार , दिलीप लाडगे आदींसह महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते व हजारोच्या संख्येने मतदार बंधू-भगिनी व युवक मित्र उपस्थित होते.