नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

नागपूर जिल्हयातील ग्राम पंचायत निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश एकुण 361 पैकी 237 ग्रामपंचायतीं वर भाजपाचा झेंडा

निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश एकुण 361 पैकी 237 ग्रामपंचायतीं वर भाजपाचा झेंडा-जिल्हा अध्यक्ष सुधाकर कोहळे

नागपुर दिनांक.6 नोंहेंबर 2023:- नागपूर जिल्हयातील ग्राम पंचायत निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश एकुण 361 पैकी 237 ग्रामपंचायतीं वर भाजपाचा झेंडा-जिल्हा अध्यक्ष सुधाकर कोहळे नुकत्याच संपन्न झालेल्या नागपुर जिल्हयातील ग्राम पंचायत निवडणुकीचे निकाल लागले असुन निवडणुक झालेल्या 361 ग्राम पंचायतींपैकी 237 ग्राम पंचायतींवर भाजपाचे सरंपच निडुन आले आहेत.तर 3005 ग्राम पंचायत सदस्यांच्या झालेल्या निवडणुकी पैकी 1821 सदस्य हे भाजपाचे निवडुन आलेले आहेत. जिल्हयातील 5 ग्राम पंचायतीतील सरपंच हे यापुर्वीच अविरोध निर्वाचीत झालेले आहेत या अविरोध झालेल्या सरपंचा पैकी 4 सरपंच हे भाजपाचे असुन अविरोध निर्वाचीत झालेल्या ग्राम पंचायत सदस्या पैकी 14 सदस्य हे भाजपा चे आहेत हे विशेष. यावेळी प्रथमच सर्व तालुक्यातुन प्रत्येक ग्राम पंचायत करीता स्वतंत्रपणे उमेदवारांकडुन भारतीय जनता पक्षाचे संलग्नीत सदस्य असल्या बाबतचे अर्ज निवडणुकी पुर्वीच भरुन घेतले असल्यामुळे आम्ही करीत असलेला दावा हा सप्रमाण आहे.काटोल तालुक्यातील पुसागोंदी या ग्राम पंचायतीमध्ये सरपंच पदासाठीच्या अनु.जाती प्रवर्गातील एकही उमेदवार कोणत्याच पक्षाला मिळाला नाही त्यामुळे तिथे केवळ सदस्य पदासाठीच निवडणुक घेण्यात आली.राज्यात एकनाथजी शिंदे-देवेन्द्रजी फडणविस-अजीतजी पवार यांचे महायुतीचे सरकार आल्यापासुन विशेषत: नागपुर जिल्हयात उपमुख्यमंत्री मा.देवेन्द्रजी फडणवीस आणि प्रदेश भाजपा अध्यक्ष मा.चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी धडाकेबाज निर्णय घेवुन जिल्हयातील ग्राम पंचायतींना मोठया प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला.पांधन रस्ते,अंर्तगत रस्ते, नाली बांधकाम,25-15 चा निधी, जिल्हा नियोजन समीतीच्या माध्यमातुन जनसुवीधेची कामे करण्यात आल्यामुळेच एवढया मोठया प्रमाणात यश प्राप्त झाले आहे हे विशेष. विधानसभा क्षेत्र निहाय व तालुका निहाय निर्वाचीत सरपंच व ग्राम पंचायत सदस्य संख्या पुढील प्रमाणे आहे. सर्व नवनिर्वाचीत सरपंच आणि सदस्य यांचे
मन:पुर्वक हार्दीक अभिनंदन. या पत्रकार परिषदेला उपस्थित आशिषजी देशमुख प्रदेश ओबीसी मोर्चा प्रभारी, अरविंदजी गजभिये रामटेक लोकसभा प्रमुख, अशोकराव धोटे, अनिल निदान, अजय बोढारे संध्याताई गोतमारे, आदर्श पटले, रिंकेश चवरे, अनुराधाताई अमिन, विशाल भोसले, रोहित पारवे, निलेश बुचुंडे, सहप्रसिध्दी प्रमूख कपिल आदमने व मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.