नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

रोजगार, महागाई, नागनदी प्रकल्प व महिला कुस्ती पटूंच्या प्रश्नांवर केंद्रीय मंत्री गडकरींचे गोलमटोल उत्तर !

गडकरी यांनी पत्रकारांना संबोधित केल्यानंतर लगेच एका न्यूज पोर्टलच्या संपादकाने केंद्र सरकारने आता पर्यंत किती शासकिय नोकऱ्या दिल्या व किती जणांना देणार असा गडकरी यांना प्रश्न केला

नागपूर, दिनाक 4जुन 2023 :- देशात वाढती बेरोजगारी, महागाई, नागपुरचा नागनदी प्रकल्प आणि महिला कुस्ती पटूंवर अत्याचार प्रकरणी नागपुरच्या न्यूज पोर्टलच्या संपादकांनी विचारलेल्या प्रश्नांवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गोलमटोल उत्तर दिले. केंद्रातील मोदी सरकारचा ९ वर्षांच्या विकासाचा पाढा वाचून गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गुणगौरव केला. नागपूरच्या रामदासपेठ येथील तूली इम्पेरियल या नामांकीत हॉटेल मध्ये रविवार ४ जून २०२३ रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास केंद्रातील मोदी सरकारचे ९ वर्ष या विषयावर नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यामध्ये, राष्ट्रीय, स्थानिक वृत्त वाहिण्यांचे प्रतिनिधी तसेच नागपुरातील विविध न्यूज पोर्टलचे संपादक उपस्थित होते.
गडकरी यांनी पत्रकारांना संबोधित केल्यानंतर लगेच एका न्यूज पोर्टलच्या संपादकाने केंद्र सरकारने आता पर्यंत किती शासकिय नोकऱ्या दिल्या व किती जणांना देणार असा गडकरी यांना प्रश्न केला. हा प्रश्न ऐकताच गडकरी हे बुचकड्यात पडले. आणि त्यांनी स्व:तला सावरत आता पर्यंत केंद्राने किती बेरोजगारांना कर्ज दिले. आणि खाजगी कंपन्यानी दिलेला रोजगार या संदर्भात माहिती देऊन विषयाला कलाटनी दिली. त्यांनी वरिल प्रश्नाचे उत्तर दिले नाही. वाढत्या महागाई संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर गडकरी यांनी अर्थशास्त्रीय दृष्टीकोणातून उत्तर दिले. जेंव्हा की सर्वसामान्य जनतेला काही घेणदेण नसते. नागनदी ड्रिम प्रोजेक्ट संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर गडकरी यांनी हसत उत्तर देत बगल देण्याचा प्रयत्न केला. दिल्ली येथे सुरु असलेल्या महिला कुस्ती पटूंच्या आंदोलना संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर गडकरी यांनी उत्तर देण्याचे टाळले. वरिल सर्व प्रश्न हे नागपुरच्या विविध न्यूज पोर्टलच्या संपादकांनी विचारले. एक ते दोन वृत्त वाहिण्यांच्या पत्रकारांना वगळता इतर पत्रकारांनी मोदी व गडकरी यांच्या गुणगौरवा संदर्भातच प्रश्न विचारला, हे विशेष. (दि.4 जुन 2023)