नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

अग्नीवीर सैन्यभरती मेळावा 10 जूनपासून

बुलढाणा वगळता विदर्भातील दहा जिल्ह्यातील उमेदवार या भरती मेळाव्यात सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर पत्रकार परिषदेत दिली

नागपूर,दि. 6 जुन 2023 :- विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथे 10 ते 17 जून या कालावधीत अग्नीवीर सैन्यभरती मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. बुलढाणा वगळता विदर्भातील दहा जिल्ह्यातील उमेदवार या भरती मेळाव्यात सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर पत्रकार परिषदेत दिली.
सैन्यभरती कार्यालय नागपूरचे संचालक कर्नल आर. जगथ नारायण, लोकल मिलिटरी अथॅारिटी जीआरसी कामठीचे ले. कर्नल भुवन शहा, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डॅा. शिल्पा खरपकर यावेळी उपस्थित होते. अग्नीवीर भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा मार्च 2023 मध्ये घेण्यात आली. त्याचा निकाल 20 मे रोजी जाहीर करण्यात आला. या परीक्षेमध्ये उत्तीर्ण उमेदवारांनाच या मेळाव्यात प्रवेश देण्यात येणार आहे. आपले सरकार केंद्राच्या मदतीने येणा-या उमेदवारांच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करयात येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्वयंसेवी संस्थांनी या मेळाव्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.(दि.6 जुन 2023)