नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

एमआयडीसीतील कटारिया ऍग्रो प्रोडक्ट कंपनीत स्फोट होऊन लागली आग, आगीत होरपळून ३ कामगारांचा मृत्यू..तिघे गंभीर ।।

एमआयडीसीतील बायोमास पॅलेट तयार करणाऱ्या कारखान्यात स्फोट होऊन लागलेल्या आगीत तीन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. तर ३ मजूर गंभीररित्या भाजल्याची घटना

हिंगणा, ता २४ एप्रल 2 023 :- एमआयडीसीतील बायोमास पॅलेट तयार करणाऱ्या कारखान्यात स्फोट होऊन लागलेल्या आगीत तीन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. तर ३ मजूर गंभीररित्या भाजल्याची घटना आज सकाळी १०;३० च्या सुमारास घडली. या कारखान्यात त्यावेळी सुपरवायझर व १४ कामगार काम करीत होते त्यापैकी काही सुखरूप बाहेर पडले मात्र यातही आणखी दोन मजुरांचा अद्याप शोध लागला नाही. त्यामुळे त्यामुळे मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी बारा अग्निशमन दलाच्या गाड्या सतत कार्यरत असून अजूनही आग विझली नाही.मात्र या आगीत कारखान्यातील सर्व कच्चा-पक्का माल व मशिनरी जळून खाक झाल्या. या घटनेत लाखोंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.एमआयडीसीत सोनेगाव (निपाणी) ला लागूनच कटारिया ऍग्रो प्रोडक्ट प्लॉट क्र. ई ५२/२ हा दीक्षांत भरत कटारिया यांच्या मालकीचा कारखाना आहे. यात लाकडी भुसा व गवत काड्या पासून बायोमास पॅलेट या भट्टीत जाळण्यासाठी कांड्या तयार करण्यात येतात. आज पहिल्या पाळीत सुपरवायझर योगपाल गणवीर व १४ कामगार कामावर हजर होते. सकाळी १०;३० च्या सुमारास अचानक मोठा स्फोट झाला.त्यानंतर अचानक आग लागली .कारखान्यापासून १०० फूट बाजूला लागूनच असलेल्या सोनेगावतील नागरिकांच्या घरातील कपाटातील भांडे सुद्धा खाली पडायला लागले. लोक घराबाहेर निघाले तेव्हा बाजूच्या कारखान्याला आग लागलेली दिसली. सुपरवायझर व काही कामगार बाहेर पळत आले. त्यांनी आणखी बरेच कामगार आतमध्ये अडकल्याचे सांगताच येथील ग्राम पंचायत सदस्य विनोद लंगोटे यांनी अग्निशमन दल व एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली व काही गावकऱ्यांना सोबत घेऊन कारखाण्यातून काही जखमींना बाहेर काढले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या व रुग्णवाहिका पण घटनास्थळी दाखल झाल्या .घटनास्थळी च तीन मजुरांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता. तर तीन जखमी मजुरांना तात्काळ काही अंतरावर असलेल्या अमेरिकन अंकॉलॉजी इन्स्टिट्यूट या रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. ही आग आटोक्यात आणण्यासाठी एमआयडीसी ,नागपूर महानगरपालिका सह विविध ठिकाणाहून १२ अग्निशमन दलाच्या गाड्या लावण्यात आल्या होत्या. सायंकाळपर्यंत ही आग विझविण्यासाठी प्रयत्न करीत होते या घटनेत सर्व मजूर इतके भाजलेले होते कि मृत पावलेल्या मजुरांची सुद्धा ओळख पटविण्यात अद्याप पोलिसांना यश आले नाही. जखमी मजूर सुद्धा बेशुद्ध असल्याने त्यांचीही नावे स्पष्ट होऊ शकली नाही. पोलीस विभागाचे अधिकारी सायंकाळी उशिरा पर्यंत चित्र स्पष्ट होईल असे सांगत होते. पोलीस उपायुक्त अनुराज जैन,नागपूर ग्रामीणचे तहसीलदार वानखेडे, सहायक पोलीस आयुक्त प्रवीण तेजाळे, ठाणेदार भीमा नरके व अधिकारी घटनास्थळीच थांबून होते. प्रशासनाकडून तिथे चार रुग्णवाहिका थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे आणखी काही कामगार आतमध्ये अडकून असल्याची चर्चा सुरू होती. या कारखान्याला सर्व बाजूंनी टिनाचे पत्रे लावून बंद केले आहे.केवळ रस्त्याच्या एकाच दिशेला दोन गेट ठेवण्यात आले आहे. स्फोट झाला ते ठिकाण या गेटपासून बरेच लांब आहे. स्फोट झाल्याबरोबर आग लागली व सर्वत्र धूर पसरला. धुरामुळे मागचेपुढचे काहीच दिसत नव्हते .हे या गावातील नागरिकांनी सांगितले. त्यामुळे गेटच्या जवळपास असलेले कामगार बाहेर पडले परंतु तिथे जखमी झालेल्या कामगारांना बाहेर पडता आले नाही.त्या धुरामुळे गुदमरून देखील त्यांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे आमदार समीर मेघेकडून घटनास्थळा ची पाहणी* या भागाचे आमदार समीर मेघे यांनी घटनास्थळ पाहणी केली. या घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांप्रती दुःख व्यक्त करीत जखमींना व मृत्यु झालेल्या मजुरांच्या कुटुंबियांना मदत मिळावी यासाठी उपमुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार असून आमचे संवेदनशील सरकार त्यांना मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या कारखान्याचा बाजूच्या गावाला त्रास होत असल्याची तक्रार होती. याविषयी पत्रव्यवहार झाल्याचे सांगत त्यांनी या घटनेची चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. या कारखान्याला गावकऱ्यांचा विरोध :सरपंच धुर्वे।। गावशेजारी असलेल्या खेळाच्या मैदानात दोन वर्षांपूर्वी या कारखान्याला मंजुरी देण्यात आली. या कारखान्यातील धूर व भुसा गावभर पसरत असून घरातील भांड्यावर सुद्धा धूळ जमा होते. या करखाण्यासमोरून ये जा गावकऱ्यांनी बंद केली आहे. अनेकांना फुफुसाचे आजार झाले आहेत.गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून हा कारखाना बंद करण्यात यावा अशी मागणी प्रशासनाला केली असून हा कारखाना बंद करण्याची मागणी सरपंच तेजस्विनी धुर्वे यांनी केली. चुकीच्या पद्धतीने बांधकामाला मंजुरी :- ग्राम पंचायत सदस्य लंगोटे या कारखान्याने पूर्ण जागेवर शेड उभारले असून आजूबाजूला संरक्षक भिंत सुद्धा नाही.केवळ एकाच बाजूला गेट आहे. इतर दिशेला मजुरांना बाहेर पळता आले असते तर काही जणांचे प्राण वाचले असते. अशा बांधकामांना एमआयडीसी कडून परवानगी कशी मिळाली याची चौकशी करण्यात यावी व गावाशेजारी धूळ पसरविणारा हा कारखाना बंद करण्याची मागणी येथील ग्राम पंचायत सदस्य विनोद लंगोटे यांनी केली आहे. ( दि.24 एप्रील 2023)