नागपूर - हिंगणा :- दिनांक 22 मार्च 2023:- नीलडोह ग्रामपंचायत कार्यालय येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघ व शक्ती मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल यांच्या माध्यमातून हेल्थ चेकअप व जिल्हा व्यवस्थापक ओबीसी महामंडळ तर्फे ओबीसींना रोजगार बाबत माहिती देण्यात आली व कु. डॉ.स्नेहा शिवकुमार मेश्राम निलडोह या मुलीचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी अध्यक्षस्थानी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष राजू चौधरी उदघाटक नागपूर जिल्हा युवा अध्यक्ष अनिलभाऊ चानपूरकर प्रमुख पाहुणे डॉ. देवेंद्रजी कैकाडे सौ.डॉ आशाताई कैकाडे डॉ.सौ.अश्विनीताई उमाळे ज्येष्ठ पत्रकार लीलाधरजी दाभे ज्येष्ठ पत्रकार विनायकरावजी इंगळे , गजाननरावजी ढाकुलकर , हिंगणा तालुका युवा अध्यक्ष अरुण कैकाडे , हिंगणा तालुका उपाध्यक्ष श्याम फलके ,नागपूर जिल्हा युवा संघटक राहुल देवगिरकर , तुषार दुरबुडे , वानाडोंगरी शहर अध्यक्ष सतीश सातपुते ,मुन्नाजी डाहात , शिवकुमारजी मेश्राम ,विठ्ठलजी हुलके , विनोद लोखंडे , अंकित कैकाडे व संचालन लीलाधरजी दाभे व आभार अरुण कैकाडे यांनी केले व असंख्य ओबीसी बंधू आणि भगिनी उपस्थित होत्या. (दि.22 मार्च 2023)