नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

सुप्रसिद्ध गायक स्वराज सरकटे यांना स्वातंत्र्यवीर सावरकर संगीत कार्य गौरव पुरस्कार

नावाजलेला युवागायक स्वराज प्रमोद सरकटे यास स्वातंत्र्यवीर सावरकर संगीत कार्य गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे दि.26 फेब्रुवारी रोजी देण्यात येणार असल्याचे

दिनांक.25 फेब्रुवारी :- मराठवाड्यातील अल्पावधीतच नावाजलेला युवागायक स्वराज प्रमोद सरकटे यास स्वातंत्र्यवीर सावरकर संगीत कार्य गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे दि.26 फेब्रुवारी रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर मित्र मंडळाच्या वतीने भानुदास चव्हाण नाट्यगृहात सिनेअभिनेते योगेश सोमण. आणि मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर मित्र मंडळाच्या 25 व्या वर्धापनदिनानिमित्त यावर्षी विविध क्षेत्रातील 25 मान्यवरांना सामाजिक ,सांस्कृतिक कार्याबद्दल पुरस्कार जाहीर झाले आहेत. स्वराज यांनी आपल्या कमी वयातच अनेक पुरस्कार प्राप्त केले. वयाच्या 16 व्या वर्षी इंडोनेशिया येथील सावरकर विश्व संमेलनासाठी तो गायनासाठी निमंत्रित होता .पुणे येथेही बालगंधर्व संगीत महोत्सव सन्मान,मराठवाडा युवारत्न पुरस्काराने स्वराज यांना सन्मानित करण्यात आले आहे. नुकतेच मध्यप्रदेश मधील इंदौर येथे तेरावे स्वातंत्र्यवीर वि दा सावरकर साहित्य संमेलन मुख्य सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत सुप्रसिद्ध गायक व संगीतकार प्रमोद सरकटे व युवागायक स्वराज सरकटे यांचे राष्ट्रभक्ति गायन खास आयोजित करण्यात आलेले होते. वीर सावरकर स्मारक समिती इंदौर आणि अखिल भारतीय हिंदू महासभा इंदौर यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन संपन्न झाले. यावर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर संगीत गौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.(दि.25/2/2023)