नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

पवित्र दीक्षाभूमीवर, माता रमाई यांच्या अर्ध्याकृती पुतळयाचे अनावरण

पवित्र दीक्षाभूमीवर, माता रमाई यांच्या अर्ध्याकृती पुतळयाचे अनावरण आज सकाळी दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरई ससाई यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न

नागपूर दिनांक .7 फेब्रुवारी :- नागपूर येथे पवित्र दीक्षाभूमीवर माता रमाई च्या पुतळयाचे अनावरण महाराष्ट्रातील प्रबुध्द नागरिकांच्या मागणीनुसार पवित्र दीक्षाभूमीवर परमपूज्य डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुविध्द पन्ती माता रमाई यांच्या अर्ध्याकृती पुतळयाचे अनावरण आज सकाळी दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरई ससाई यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले . महाराष्ट्रातील अनेक संस्थांच्या मागणीवरून दीक्षाभूमी स्मारक समितीने हा निर्णय घेतला . दीक्षाभूमीवर भव्य स्तुपाच्या आत हा पुतळा उभारण्यात आला यावेळी दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव मा . डॉ . सुधीर फुलझेले ,विश्वस्त श्री . विलास गजघाटे ,एन.आर.सुटे, भन्ते नागदिपांकर, भन्ते सुगतबोधी , जपानचे भिक्षू संघ, प्रबुध्द उपासिका महिला मंडळाच्या अध्यक्ष श्रीमती कमल भगत कोषाध्यक्ष, मिनाताई मुन, यशोधरा सावनकर, मिनाताई खैरकर चंद्रकलाताई दुपारे, बोरकरताई रंजना धाबर्डे राजकुमार वंजारी,आर.बी.सिंग, गौतम मोरे, महेन्द्र मडामे, प्रदीप मुन, चित्रकार सुरेश मुन व जेष्ठ पत्रकार प्रभाकर दुपारे याची प्रामुख्याने उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मधुकर मेश्राम, देवाजी रंगारी, मेश्राम, सतिश रामटेके मिलिंद थुल यांनी विशेष परिश्रम घेतलेत.(दि.7 फेब्रुवारी 2023)