नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

नागपूरमध्ये पेपरफ्राय च्या नवीन स्टुडिओचे नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन

पेपरफ्राय या फर्निचर व गृहोपयोगी वस्तू क्षेत्रातील अग्रगण्य इ-कॉमर्स,कंपनीने नागपूरात आपला दुसरा स्टुडिओ सुरू केला आहे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत या स्टोअरचे भव्य उद्घाटन झाले

नागपूरमध्ये पेपरफ्राय च्या नवीन स्टुडिओचे नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन नागपूर दि.29 जुन :- पेपरफ्राय या फर्निचर आणि गृहोपयोगी वस्तू क्षेत्रातील अग्रगण्य इ-कॉमर्स कंपनीने नागपूर येथे आपला दुसरा स्टुडिओ सुरू केला आहे. रस्ते वाहतूक व महामार्ग खात्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत या स्टोअरचे भव्य उद्घाटन झाले. पेपरफ्राय स्टुडिओने भारतातील फर्निचर रिटेल क्षेत्रामध्ये कायापालट घडवून आणला आहे. देशभरात एफओएफओ स्टुडिओ उभारण्याचे व त्यातून ओम्नीचॅनेल स्वरुपात विस्तार करण्याचे कंपनीचे धोरण आहे. हा ऑफलाइन विस्तार करताना, विशिष्ट बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्याच्या आणि घरगुती फर्निचरच्या क्षेत्रात एक मजबूत ओम्नीचॅनेल व्यवसाय मॉडेल उभे करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. त्यानुसारच कंपनी सध्या ९०पेक्षा जास्त भागीदारांसह कामकाज करीत आहे.पेपरफ्राय’च्या १७० हून अधिक स्टुडिओंचे नेटवर्क ९०हून अधिक शहरांमध्ये उभे आहे. अर्थ वर्थ प्रा. लिमिटेड या कंपनीच्या भागीदारीत पेपरफ्रायचा हा नवा स्टुडिओ नागपूरमध्ये वर्धा रस्ता हॉटेल शिवानीच्या शेजारी १४ राजीवनगर या मोक्याच्या ठिकाणी ७३० चौरस फूट जागेत उभारण्यात आला आहे. येथे ग्राहकांना फर्निचर आणि घरगुती उत्पादनांचा विस्तृत पट पाहावयास मिळेल. ग्राहकांना कंपनीच्या इंटिरियर आणि डिझाइन सल्लागारांकडून डिझाइनबाबत विशेष सल्लादेखील मिळू शकतो. महाराष्ट्रातील घरगुती वस्तूंच्या ग्राहकांच्या अनन्य गरजांनुसार वैयक्तिकृत खरेदीचा अनुभव प्रदान करणे आहे हा या नागपुरातील स्टुडिओचा उद्देश आहे. पेपरफ्राय च्या फ्रॅन्चायझिंग आणि अलायन्सेस या विभागाच्या व्यवसाय प्रमुख अमृता गुप्ता म्हणाल्या नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत नागपुरात नवीन स्टुडिओ सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. ग्राहकांना नेहमीच पर्याय उपलब्ध असतो हे तत्व पेपरफ्राय च्या खास बाजारपेठेच्या माध्यमातून पुढे आणण्यात येते. घरगुती फर्निशिंग उद्योग ग्राहकांच्या निवडीतून विकसित होत असताना, पश्चिम भारतातील आमची विस्तार योजना ग्राहकांना विशिष्ट फर्निचरच्या खरेदीचा अनुभव देण्यास सक्षम असेल. आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये ग्राहकांना व्हर्च्युअल रिअॅलिटीच्या ऑफरदेखील दिल्या आहेत. आज पेपरफ्राय च्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर एआर आणि व्हर्च्युअल प्रॉडक्ट इंटरअॅक्शन चा लाभ घेता येतो. जगभरात घर ही संकल्पना जागृत करण्याच्या आमच्या ध्येयातून आम्ही सातत्याने ग्राहकांना उत्तम आनंद देण्याचा प्रयत्न करतो. या प्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले नागपुरातील पेपरफ्राय च्या नवीन स्टुडिओच्या उदघाटन समारंभाचा एक भाग बनून मला खूप आनंद झाला. हा ब्रँड भारतात किती पटींनी वाढला आहे, हे पाहणे खूप महत्त्वाचे आहे. मी पेपरफ्रायच्या संघाला मोठे यश मिळविण्यासाठी आणि भविष्यातील उज्ज्वल कामगिरीसाठी शुभेच्छा देतो. अर्थ वर्थ प्रा. लि.च्या मालक डॉ. स्मिता भाबरा म्हणाल्या आम्हाला पेपरफ्राय सह भागीदारी करताना आनंद होत आहे. या कंपनीने एक विशिष्ट प्रकारचा ओम्नीचॅनेल व्यवसाय निर्माण केला आहे आणि आम्हाला आशा आहे की या व्यवसायातून ग्राहकांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्यात आमच्या संस्थेला मदत होईल.(दि.29/ जुन 2022)