नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

मातृ सेवा संघ , यांच्या वतीने दोन दिवसाचे त्याच्या शताब्दी उत्सवाच्या निमित्याने सेंटिकॉन 2021परिषदेचे आयोजन करणार

मध्य भारतातील सर्वात जुनी सेवाभावी संस्था, मातृ सेवा संघ, दिनांक 2 आणि 3 ऑक्टोबर 2021 रोजी त्याच्या शताब्दी उत्सवाच्या निमित्याने सेंटिकॉन 2021 परिषदेचे आयोजन करणार

नागपूर दि.28 सप्टेंबर :- मध्य भारतातील सर्वात जुनी सेवाभावी संस्था, मातृ सेवा संघ, दिनांक 2 आणि 3 ऑक्टोबर 2021 रोजी त्याच्या शताब्दी उत्सवाच्या निमित्याने , सेंटिकॉन 2021 परिषदेचे आयोजन करणार आहे, मातृ सेवा संघाची स्थापना स्वर्गीय पद्मश्री कमलताई हॉस्पेट आणि वेणुताई नेने यांनी 1921 मध्ये अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर गर्भवती महिलांना दर्जेदार वैद्यकीय सेवा पुरवण्याच्या उद्देशाने केली होती .ज्या 5 खाटांच्या प्रसूती सुविधेची सुरुवात करण्यात आली होती ते आज विदर्भ, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश येथील 13 शाखेची बलवान स॑स्था झाली आहे. वर्षानुवर्षे संस्थेच्या कामाच्या क्षेत्रात अनेक प्रकारच्या सेवा जोडल्या आहेत ज्यात प्रामुख्याने परिचारिका प्रशिक्षण ,समाजकार्य संस्था, नंदनवन/स्नेहांगण - बौद्धिक आणि अस्थिव्यंग मुलांसाठी शाळा ,वसतिगृह आणि आश्रय कार्यशाळा, पंचवटी वृद्धाश्रम, कुसुम विहार-वृद्धांसाठी अल्प मुक्काम आसरा, बाल दत्तक केंद्र, कार्यरत महिला वसतिगृह, कौटुंबिक समुपदेशन केंद्र आणि मातृ सेवा मासिक यांचा समावेश आहे. आज सीताबर्डी मॅटर्निटी होम हे एक बहुआयामी रुग्णालय आहे जे महिलांना आधुनिक प्रसूती आणि स्त्रीरोगविषयक सेवा प्रदान करते आणि सोनोग्राफी, डॉप्लर, हिस्टेरोस्कोपी, लेप्रोस्कोपी, कोल्पोस्कोपी, मॅमोग्राफी, फर्टिलिटी क्लिनिक, कॅन्सर स्क्रीनिंग, रजोनिवृत्ती सेवा यांचा समावेश असलेली मातृ सेवा संघ इतर समकालीन सामाजिक संस्थांमध्ये वरचढ ठरली आहे. मातृ सेवा संघाच्या अध्यक्ष सध्या डॉ अरुणा बाभुळकर आहेत आणि त्यांचे सचिव डॉ. लता देशमुख यां व्यवस्थापन साभऻळत आहे. 100 वर्षे पूर्ण झाल्याची घोषणा करताना आम्हाला खूप आनंद होत आहे, आम्ही 2 आणि 3 ऑक्टोबर, 2021 रोजी भौतिक स्वरूपात सीताबर्डी येथे आमच्या परिसरात "CentiCon2021" परिषद आयोजित करत आहोत. संयोजक म्हणून डॉ.निर्मला वझे आणि संरक्षक म्हणून डॉ.प्रमिल असोलकर आणि डॉ.मंजूला रोहतगी यांच्यासह एक आयोजन समिती स्थापन करण्यात आली आहे. डॉ.रत्ना शेखावत आणि डॉ.वैशाली वराडकर हे आयोजक अध्यक्षांचे काम बघत आहेत. डॉ ॠषी लोडाया आणि डॉ कामिनी नाकाडे संघटन सचिव आहेत. डॉ.प्रतिभा लांजेवार या खजिनदार आहेत. सेंटीकॉन 2021 ची संयुक्तपणे नागपूर प्रसूतिशास्त्र व स्त्रीरोग संस्था (NOGS), नॅशनल असोसिएशन ऑफ रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ ऑफ इंडिया (NARCHI) नागपूर चॅप्टर, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर (IGGMC), बालरोग अकादमी, नागपूर आणि इंडियन सोसायटी ऑफ अनेस्थेसियोलॉजिस्ट्स नागपूर शहर शाखा(ISA-NCB ) ह्यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे. संमेलनाचे घोषवाक्य "जन्म आणि पलीकडे" असे ठरले आहे. 2 ऑक्टोबर रोजी दुपारी 1-30 ते संध्याकाळी 6 च्या दरम्यान एकूण 4 कार्यशाळा मातृ सेवा संघ सीताबर्डी येथे आयोजित केल्या जातील. डॉ. अलका मुखर्जी, अध्यक्ष एनओजीएस, डॉ. क्षमा केदार आयजीजीएमसी येथील सहाय्यक प्राध्यापिका प्रसुतिपश्चात रक्तस्त्राव कार्यशाळा घेतील. डॉ. उज्ज्वला देशमुख, अध्यक्ष NARCHI नागपूर चॅप्टर सिझेरियन डिलीव्हरी कार्यशाळा आयोजित करतील, डॉ. विजय धोटे, अध्यक्ष बालरोग अकादमी, नागपूर मूलभूत नवजात पुनरुत्थान कार्यक्रम आयोजित करतील आणि डॉ. सौरभ बर्डे, अध्यक्ष ISA, नागपूर शहर शाखा, बेसिक लाईफ सपोर्टचे कौशल्य ह्याची कार्यशाळा घेतील. 3 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत दिवसभरांचा सतत वैद्यकीय शिक्षण कार्यक्रम योजिला आहे श्रीमती प्राजक्ता लवंगरे वर्मा, विभागीय आयुक्त, नागपूर विभाग प्रमुख पाहुणे असतील आणि डॉ भावना सोनवणे, डीन IGGMC, नागपूर ,दि.3 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता उदघाटनासाठी अतिथी म्हणून उपस्थित राहतील. नागपुरातील प्रख्यात डॉक्टर वैज्ञानिक सत्रात विविध क्लिनिकल संबंधित विषयांवर चर्चा करतील, ज्यात समाविष्ट आहे किशोरवयीन पीसीओएस, मानवी दूध बँक: काळाची गरज, पौगंडावस्थेतील लसीकरणाचे अपडेट, ओव्हुलेशन इंडक्शनमधील वर्तमान संकल्पना, वंध्यत्वामध्ये हिस्टेरो-लेप्रोस्कोपीची भूमिका, आरपीएलचे विहंगावलोकन, गर्भधारणेमध्ये थायरॉईड विकार, गर्भधारणे आणि प्यूरपेरियम मध्ये मानसिक आरोग्य , प्रसूती आणि स्त्रीरोग व्यवसाय सरावा मध्ये मेडिकोलीगल समस्या. दुपारच्या जेवणा नंतरच्या सत्रात औषधाची प्रगती: एक सेल दोन कथा ,यावर कमलाताई हॉस्पेट मेमोरियल वक्तव्य असेल .त्यानंतर एमटीपी कायदा आपल्याला सराव करण्याची काय गरज आहे, शॉक चे व्यवस्थापन, एंडोमेट्रिओसिसचे व्यवस्थापन, ब्रेस्ट लंप असल्यास काय दृष्टिकोन, असामान्य पॅप स्मीयर अहवाल - काय पुढे? , प्री-ऑपरेटिव्ह इव्हॅल्यूएशन आणि ऑप्टिमायझेशन, एआरटी मध्ये आययूआयची सद्य स्थिती ,पहिल्या तिमाही स्क्रीनिंग- नवीन आवश्यक बाब. संमेलनाचा समारोप कृतज्ञता कार्यक्रमाने होईल. नागपूर ऑब्स्ट्रेटिक्स अँड गायनेकोलॉजिकल सोसायटी, (NOGS), नॅशनल असोसिएशन ऑफ रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ ऑफ इंडिया (NARCHI,) इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (IGGMC,) बालरोग अकादमी नागपूर (AOP-Nagpur), इंडियन सोसायटी ऑफ अनेस्थेसियोलॉजिस्ट्स नागपूर शहर शाखा (ISA-NCB) आणि मातृ सेवा संघ (MSS )चे आयोजन समिती सदस्य परिषदेच्या यशस्वीसते परिश्रम घेत आहेत.(दि.28 सप्टेंबर 2021)